आजचा शास्त्रभाग: प्रकटी ४:४-११

द वंडरफूल विझर्ड ऑफ ऑझमध्ये (एका पुस्तकावर आधारलेले एक इंगजी नाटक) डॉरथी, शेतातले  बुजगावणे, टिन मॅन, आणि तो भेकड सिंह हे वेस्टच्या वीकेड विचला (पश्चिमेची दुष्ट चेटकीण)शक्ती पुरवणारा केरसुणीचा दांडा घेऊन ऑझकडे परत येतात. केरसुणीच्या दांड्याच्या बदल्यात त्या चौघांना त्यांची सर्वात उत्कट इच्छा पूर्ती : डोरोथीला घरापर्यंत पोहोचवणे, त्या बुजगावण्यासाठी एक मेंदू, टिन मॅन साठी एक हृदय, आणि भेकड सिंहाला हिम्मत ह्या गोष्टीं देण्याचे अभिवचन दिले होते. पण विझर्ड विलंब करतो आणि पुढील दिवशी त्यांना परत यायला सांगतो.

ते विझर्डला विनवण्या करत असतांना, डॉरथीचा कुत्रा टोटो, ज्याच्या आडून विझर्ड बोलत होता तो  पडदा मागे खेचतो आणि मग स्पष्ट दिसते की तो विझर्ड हा कोणी जादूगार नाहीच मुळी, तो तर नेब्रास्काचा एक भेदरलेला, अस्वस्थपणे चुळबुळ करत राहणारा एक मनुष्य होता.

असे म्हटले जाते की लेखक, एल. फ्रॅंक बॉम, ह्याला देवाबाबत गंभीर आक्षेप होते आणि म्हणून त्याला हा संदेश पाठवण्याची इच्छा होती की आपले प्रश्न सोडवण्याची शक्ती केवळ आपल्याजवळचआहे.

ह्याउलट, प्रेषित योहान पडद्यामागील खराखुरा अद्भुत असा एक देव प्रकट करण्यासाठी तो “पडदा” मागे खेचून काढतो. योहानाला शब्द सुचत नाहीत (सारखे, तत्सम) ह्या शब्दयोगी अव्ययाचा पुन्हा पुन्हा केलेला वापर पहा, पण मुद्दा योग्य रीतीने मांडला आहे: देव त्याच्या काचेसारखा दिसणाऱ्या समुद्राने घेरलेल्या राजासनावर बसलेला आहे (प्रकटी ४:२, ६). येथे ह्या पृथ्वीवर आपल्याला भंडावणाऱ्या दगदगी असून देखील (अध्याय २-३), देव आपली नखें कुरतडत जमिनीवर येरझारा घालत नाही. आपल्या हितासाठी तो सक्रियपणे कार्य करत आहे, यासाठी की आपण त्याची शांती अनुभवावी.

डेव्हिड एच रोपर

आज तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरता? तुम्हाला घेरणाऱ्या अडचणींवर देवाचे नियंत्रण आहे हे जाणून तुम्हाला कसा दिलासा मिळतो? तुम्ही त्याच्यावर अधिक चांगल्या रीतीने कसा भरवसा ठेवू शकता आणि त्याच्या अधीन राहू शकता?

सर्व गोष्टींत तू माझ्यासोबत चालशील ह्यावर मी विसंबून राहू शकतो म्हणून, हे देवा, मी तुला कृतज्ञ आहे. तुझ्या शांतीबद्दल तुझे आभार मानतो.

मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.