आजचा शास्त्रभाग: अनुवाद ५:१२-१५

माझ्या जवळच एक डेकोरेटर स्टोअर आहे आणि त्या दुकानाच्या एका विभागात एक मोठे हिरव्या रंगाचे बटन आहे. जर सहाय्यक हजर नसेल, तर तुम्ही ते बटन दाबता आणि एक टायमर (वेळ/विलंब नोंदणारे एक साधन) सुरु होते. जर एका मिनिटात तुमच्याकडे सहाय्यक आला नाही तर तुम्हाला तुमच्या खरेदीवर डिस्काउंट मिळतो.

अशी वेगवान सेवा पुरवणाऱ्या दुकानाचे ग्राहक व्हायला आपल्याला आवडेल. पण जेव्हा अशी सेवा पुरवणे आपल्याकडून अपेक्षित असते तेव्हा ही प्रणाली कोलमडते. पण आपल्यापैकी पुष्कळ लोकांना त्यांचे काम करतांना, खूप अधिक तास काम करावे लागते म्हणून, दररोज अनेक वेळां ईमेल चेक करावे लागते म्हणून, आणि अधिकाधिक ताणलेल्या डेडलाईन्समुळे कामाचा प्रचंड ताण येतो. डेकोरेटर दुकानाच्या ग्राहक सेवा हिकमती आपल्या जीवनात सगळीकडे शिरल्या आहेत आणि त्यांनी घाईगर्दीची एक संस्कृती निर्माण केली आहे.

जेव्हा देवाने इस्राएली लोकांना शब्बाथ पाळायला सांगितले, तेव्हा त्याने त्याचे एक महत्वाचे कारण सांगितले: “तू मिसर देशात एक गुलाम होतास ह्याची आठवण ठेव” (अनुवाद ५:१५). तेथे फारोच्या बेसुमार वेळेची बंधने पाळत त्यांना अखंडपणे काम करत राहण्याची सक्ती करण्यात आली होती (निर्गम ५:६-९). आता स्वतंत्र झालेले असल्यामुळे, ते आणि त्यांचे सेवक विश्रांती घेतात ह्याची खात्री करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी प्रत्येक आठवड्यात एक संपूर्ण दिवस घ्यायचा होता. (अनुवाद ५:१४). देवाच्या नियमानुसार, ते पडलेल्या चेहेऱ्याचे, धापा टाकत चालणारे असे ते लोक असू नयेत.

पूर्णपणे दमून जाईपर्यंत तुम्ही किती वेळ कष्ट करत असतां किंवा तुम्हाला ताटकळत वाट बघायला लावणाऱ्या लोकांवर तुम्ही चिडत असता? आपण स्वतःला आणि एकमेकांना हे थांबवायला सांगू या. घाई गडबड करण्याची संस्कृती फारोने आणली आहे, देवाने नव्हे.

शेरिडन व्हॉइसी

जादा काम करण्याच्या प्रबळ इच्छेला तुम्ही कसा प्रतिकार करू शकता?  ह्या आठवड्यात जे लोक तुम्हाला ताटकळत ठेवतात त्यांच्याशी तुम्ही सबुरीने कसे वागाल?

शब्बाथाच्या प्रभू, मी परिपूर्ण बनावे म्हणून तू मला विश्रांती करायची आज्ञा दिलीस म्हणून मी तुझे आभार मानतो.

मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.