आजचा शास्त्रभाग: हबक्कूक 1:12–2:4

बँगकॉकमधील एक लोकप्रिय उपहारगृह पंचेचाळीस वर्षें शिजत ठेवलेले आणि त्यात दररोज थोडी थोडी भर टाकलेले भाज्यांचे एक कढण विकते. मध्ययुगीन काळात “चिरंतन स्ट्यू” (पर्पेच्युअल स्ट्यू) ची ही प्रथा सुरु झाली. जसे उरलेले खाद्यपदार्थ काही दिवसांनंतर अधिक रुचकर लागतात, त्याचप्रमाणे शिजत ठेवण्याचा हा वाढीव समय त्या सुपामध्ये नवी लज्जत मिसळून अद्वितीय असा स्वाद देतो. ह्या उपहारगृहाने थायलंडमधील सर्वाधिक लज्जतदार सुपाकरिता अनेक पारितोषिके जिंकली आहेत.

चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच वेळ लागतो, पण आपल्या मानवी स्वभावाला धीर धरवत नाही. संपूर्ण बायबलमध्ये “अजून किती वेळ?” हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेला दिसून येतो. दुःखाची भावना चाळवते ते एक उदाहरण हबक्कूक संदेष्टा त्याच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच हा प्रश्न विचारून सुरु करतो (हबक्कूक 1:2). हबक्कूकने (त्याच्या नावाचा “घट्ट पकडून ठेवणारा” असा अर्थ आहे) त्याच्या देशावर (यहूदा) की बाबेलच्या निर्दय साम्राज्याचे आक्रमण होईल असा देवाच्या निवाड्याचा भविष्य संदेश सांगितला आणि इतरांचे शोषण करून अशा भ्रष्ट लोकांची भरभराट देव कशी होऊ देतो याविषयी त्याने देवाशी झगडा केला. पण देवाच्या उचित समयी त्यांना अर्धा आणि पुनर्स्थापनेचे अभिवचन देतो: “कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे …त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पहा; तो निश्चितच येईल आणि त्याला विलंब लागायचा नाही. (2:3).

बाबेलच्या दास्यत्वाचा काळ सत्तर वर्षें टिकला. मानवी हिशेबाने तो एक दीर्घ काळ आहे, पण देव नेहमीच विश्वासू असतो आणि तो त्याचे वचन पाळतो.

देवाचे काही आशीर्वाद यायला पुष्कळ वेळ लागतो. जरी त्यांना विलंब लागला तरी त्यांची वाट पाहत राहा! तो त्याचा प्रत्येक आशीर्वाद परिपूर्ण सुज्ञतेने आणि काळजीपूर्वकपणे तयार करतो —आणि त्याच्यासाठी थांबून राहणे नेहमीच रास्त असते.

जेम्स बॅंक्स

देवापासून कोणते आशीर्वाद मिळण्याची वाट तुम्ही पाहत आहात? आशीर्वाद केव्हाही येवोत पण तुम्ही त्याची उपासना करायची काय योजना करत आहात?

अब्बा, बापा, जीवनाच्या प्रत्येक ऋतूमध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक आशिर्वादात तुझा दयाळूपणा व विश्वासूपणासाठी तुझे आभार मानतो. आशेने, अपेक्षेने सर्वाधिक तुझ्याकडेच पाहत राहण्यासाठी माझे साहाय्य कर.

मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.