येशूची सेवा करण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीने अष्टोन आणि ऑस्टिन सॅम्युएल्सन हि दोघे ख्रिस्ती महाविद्यालयामधून पदवीधर झाले . तथापि, चर्च मध्ये परंपरागत चालत आलेल्या सेवेकरिता बोलावणे आहे असं त्यांना कदापि वाटले नव्हते . पण मग जगामध्ये कोंत्याप्रकारची सेवा केली जाते ? अगदीच . देवाकडून प्राप्त झालेल्या आपल्या उद्योजकीय कौशल्य द्वारेत्यांनी लहान मुलांच्या उपासमारीचा शेवट करण्या करीता त्यांच्या ह्या सेवाकार्याच्या ओझ्याला ह्या कार्याची जोड दिली , आणि २०१४ मध्ये एक उपहारगृह सुरु केले. परंतु हे उपहारगृहइतर उपाहारगृहांसारखे नव्हते . सॅम्युएल्सन बंधूंनी ‘एक विकत घ्या आणि एक दान द्या ‘ ह्या उपक्रमाचा अवलंब केला . प्रत्येकी एका वेळेच्या विकत घेतलेल्या जेवणाबरोबर लोकांनादुसर्यावेळेचे जेवण विकत घेता यावे यांसाठी पैसे दान करीत असे विशेषतः कुपोषित मुलांसाठी पौष्टिक आहार मिळावा म्हणून . आत्ता पर्यंत त्यांनी ६० देशांहून ही अधिक देशां मध्येआपली ही सेवा पुरवली . लहान मुलांची उपासमार थांबावी म्हणून ‘एका वेळेचं जेवण’ ह्या उपक्रमांतर्गत आपली सेवा व्हावी हाच त्यांचा उद्देश्य आहे .