आपली रोजची भाकर
वार्षिक आवृती २०२२
आमच्या ह्या भक्तीपर साहित्याचा तुम्ही
उपयोग करीत असल्याबद्दल तुमचे आभार . देवाला अधिक जाणून घेण्याच्या तुमच्या ह्या प्रवासाचा आम्ही एक भाग म्हणून देवाचे उपकार मानतो.
तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर
लागतात ! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा
गोड लागतात . स्तोत्रसंहिता ११९ :१०३
आमच्या ह्या भक्तीपर साहित्याचा तुम्ही
उपयोग करीत असल्याबद्दल तुमचे आभार . देवाला अधिक जाणून घेण्याच्या तुमच्या ह्या प्रवासाचा आम्ही एक भाग म्हणून देवाचे उपकार मानतो.
देवाच्या वचनाचे तुम्हाला सखोल ज्ञान देणारे विशेष लेख, पवित्रशास्त्राभ्यास, व्हिडिओस, आणि अशा अनेक साधनांविषयी माहिती घेण्याकरिता कृपया तुम्ही आमच्या
www.odb.org ह्या वेबसाइटला भेट द्या.
………………………………………..
Content by Shaul Shinde
येशूची सेवा करण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीने अष्टोन आणि ऑस्टिन सॅम्युएल्सन हि दोघे ख्रिस्ती महाविद्यालयामधून पदवीधर झाले . तथापि, चर्च मध्ये परंपरागत चालत आलेल्या सेवे करिता बोलावणे आहे असं त्यांना कदापि वाटले नव्हते . पण मग जगामध्ये कोंत्याप्रकारची सेवा केली जाते ? अगदीच . देवाकडून प्राप्त झालेल्या आपल्या उद्योजकीय कौशल्य द्वारे त्यांनी लहान मुलांच्या उपासमारीचा शेवट करण्या करीता त्यांच्या ह्या सेवाकार्याच्या ओझ्याला ह्या कार्याची जोड दिली , आणि २०१४ मध्ये एक उपहारगृह सुरु केले. परंतु हे उपहारगृह इतर उपाहारगृहांसारखे नव्हते . सॅम्युएल्सन बंधूंनी ‘एक विकत घ्या आणि एक दान द्या ‘ ह्या उपक्रमाचा अवलंब केला . प्रत्येकी एका वेळेच्या विकत घेतलेल्या जेवणाबरोबर लोकांना दुसर्यावेळेचे जेवण विकत घेता यावे यांसाठी पैसे दान करीत असे विशेषतः कुपोषित मुलांसाठी पौष्टिक आहार मिळावा म्हणून . आत्ता पर्यंत त्यांनी ६० देशांहून ही अधिक देशां मध्ये आपली ही सेवा पुरवली . लहान मुलांची उपासमार थांबावी म्हणून ‘एका वेळेचं जेवण’ ह्या उपक्रमांतर्गत आपली सेवा व्हावी हाच त्यांचा उद्देश्य आहे .