आजचा शास्त्रभाग: १ शमुवेल १७:३२, ४१-४७
२३ आठवडे आईच्या उदरात राहून जन्मलेल्या बेबी सेबी ह्या एका “मायक्रो प्रीमि” मुलीचे वजन केवळ २४५ ग्राम होते. सेबी किती दिवस जगेल ह्याविषयी डॉक्टर्स साशंक होते आणि तिच्यासोबत केवळ एखादा तास मिळण्याची शक्यता आहे असे त्यांनी तिच्या आईबापाला सांगितले. पण सेबी लढत राहिली. तिला ठेवलेल्या दांड्या असलेल्या पलंगडीत एका गुलाबी कार्डावर ” चिमुकली पण शक्तिशाली” हे शब्द लिहिले होते. हॉस्पिटलमध्ये पांच महिने राहिल्यानंतर सेमी चमत्कारपूर्ण रीतीने २.२६ किलो वजनाची एक सुदृढ बाळ बनण्याचा विश्व विक्रम नोंदवून घरी गेली.
प्रतिकूल पारिस्थितीवर मात करणाऱ्यांच्या गोष्टी ऐकण्याने हुरूप वाढतो. बायबल अशी एक गोष्ट सांगते. दावीद, एक मेंढपाळ मुलगा, गल्याथाशी — ज्याने देवाचा अवमान केला आणि इस्राएलला धमक्या दिल्या — त्या एका विशाल योद्ध्याशी लढायला स्वेच्छेने तयार होतो. शौल राजाला दाविदाची सूचना हास्यास्पद वाटली: ह्या पलिष्टयाविरुद्ध जाऊन तू त्याच्याशी लढू शकणार नाहीस; तू केवळ किशोरवयीन मुलगा आहेस आणि तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे.”(१ शमुवेल १७:३३). आणि जेव्हा त्या पोरगेलशा मुलाने रणांगणावर पाय ठेवला, तेव्हा गल्याथाने त्याच्याकडे न्याहाळून पाहिले आणि तो अल्पवयी सुकुमार होता हे त्याला दिसले” (व.४२) पण दावीद त्या लढ्यात एकट्याने आला नव्हता. तो इस्राएलच्या सैन्याच्या सर्वसमर्थ देवाच्या नावाने आला होता. (व.४५) आणि जेव्हा दिवस संपला तेव्हा एक विजयी दावीद मृत गल्याथाच्या वर उभा असलेला असा तो दिसला.
समस्या कितीही प्रचंड असली तरी जेव्हा देव आपल्याबरोबर असतो तेव्हा आपण कशाचीही भीती बाळगण्याची गरज नसते. त्याच्या बळाने आपण देखील बलशाली बनतो.
—विन कोलियर
आपण लहान आणि क्षुद्र आहोत असे तुम्हाला केव्हा वाटते? कमालीची प्रतिकूल परिस्थिती असतांना देखील देव तुम्हासोबत उपस्थित आहे आणि तो तुम्हाला बळकटी देत आहे हे तुम्ही कसे पाहू शकता?
हे देवा, आज मला अगदी किरकोळ असल्यासारखे वाटते. माझ्या कुवतीवर सोडले तर पुढे जायचा संभवच नाही. पण तू माझ्याबरोबर राहून मला मार्गदर्शन करशील असा मला भरवसा आहे. मी तुझ्या सामर्थ्यावर भरवसा ठेवत आहे.
मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.