आजचा शास्त्रभाग: उपदेशक 2:17–26
जर तुम्हाला अधिक काळ जगायचे आहे, तर एक सुटी घ्या! ज्यांच्यापैकी प्रत्येकाला हृदय रोगाचा धोका होता अशा मध्यमवयीन, पुरुष अधिकाऱ्यांचा अभ्यास करून झाल्यानंतर चाळीस वर्षांनी फिनलँडमधील संशोधकांनी त्यांच्या संशोधन भागीदारांशी संपर्क केला. वैज्ञानिकांना त्यांच्या मूळ निष्कर्षांत ते ज्याची अपेक्षा करत नव्हते असे काहीतरी सापडले: ज्यांनी सुट्या घेण्यात वेळ घालवला होता त्यांचा मृत्यू दर कमी होता.
काम हा जीवनाचा आवश्यक भाग आहे —उत्पत्ती ३मध्ये देवाबरोबरचे आपले नातेसंबंध भंगण्यापूर्वीच त्याने आपल्याला नेमून दिलेला हा भाग. जे देवाच्या सन्मानार्थ काम करत नाहीत त्यांनी अनुभवलेल्या वरवर दिसून येणाऱ्या कामाच्या अर्थशून्यतेविषयी शलमोनाने लिहिले आहे —“जीव उलथापालथा करून खटाटोप करणे” आणि “दुःखमय आणि कष्टमय दिवस” असे लिहिले आहे (उपदेशक 2:22–23). जेव्हा ते सक्रियपणे काम करत नसतात तेव्हा देखील, तो म्हणतो, त्यांच्या मनास चैन नसते, अजून काय करायची गरज आहे त्याविषयी ते विचार करत असतात (व.23).
कधी कधी आपल्याला देखील “आपण वाऱ्यामागे धावतोय”असे वाटते (व.17) आणि काम “संपवण्यात” आपली असमर्थता आपल्याला वैफल्याने ग्रासते. पण जेव्हा आपण हे आठवतो की देव आपल्या कष्टाचा भाग आहे —आपला हेतू —आपण अधिक नेटाने काम करणे आणि विश्रांती घेण्यासाठी वेळ घेणे ह्या दोन्ही गोष्टीं करु शकतो. आपला पुरवणारा म्हणून आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो, कारण तो सर्व गोष्टीं देणारा आहे. शलमोन हे मान्य करतो की “त्याच्या प्रसादावाचून खाणेपिणे व सुख भोगणे कोणाला प्राप्त होणार?” (व.25). कदाचित आपण स्वतः त्या सत्याचे स्मरण केल्याने आपण त्याच्याकरिता मेहनतीने काम करु शकू. (कलसे 3:23) आणि आपण स्वतःला विश्रांतीचा समय देखील देऊ शकू.
कर्स्टन होल्मबर्ग
तुमच्या कष्टांत तुम्ही देवाला कसे आमंत्रण देऊ शकता? तुमचे काम जरी “संपले” नसले तरी तुम्ही त्याला तुमचे समाधान (तृप्ती) कसे बनू द्याल?
देवा, माझ्या सर्व परिश्रमांना तू अर्थ आणि हेतू पुरव.
मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.