आजचा शास्त्रभाग: ईयोब 36:26–29; 37:5–7
युएसमधील मध्यमवर्ग वस्तीतील एक बँड शहरात दर वर्षी जे रूपांतर घडत असते त्याविषयी एक गीत गातो. “जेव्हा जेव्हा वर्षातील पहिला खरा हिमवर्षाव आमच्याकडे होत असे, तेव्हा काहीतरी पवित्र घडत आहे असे मला वाटे.” बँडचा सह-संस्थापक स्पष्ट करतो,”नव्याने काही सुरु करण्याच्या छोटाश्या भागासारखे. शहर मंदावू लागे आणि शांत होत असे.”
जर तुम्ही एखादा भारी हिमवर्षाव अनुभवला असेल तर, त्यातून एखादे गीत कसे स्फुरते ते तुम्हाला कळून येते. बर्फाने धूळ आणि काळपट दिसणाऱ्या गोष्टी झाकल्या जातात तसा एक जादुई शांतपणा जगाला आवरण घालतो. काही क्षणांसाठी, हिवाळ्याचे मंद, उदासवाणे वातावरण उजळते आणि त्यातून आपल्याला मनन आणि हर्ष करण्यासाठी आमंत्रण देते.
अलीहू, ज्याला देवाबाबत एक साहाय्यकारी दृष्टिकोन असू शकला असता अशा ईयोबाच्या एका मित्राने सृष्टी आपले लक्ष कसे वेधते असे सांगितले. “देव अद्भुत शब्दाने गरजतो”, (ईयोब 37:5). “तो बर्फाला म्हणतो `पृथ्वीवर पड,
`आणि पावसाच्या सरीला म्हणतो,`भारी पर्जन्यवृष्टी होऊन ये`” असे वैभव आपल्या जीवनांत एक पवित्र विराम आणून अडथळा आणू शकते. “त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे, म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो.”अलीहू बोलला (वव. 6–7). निसर्ग (सृष्टी) काही वेळां आपल्याला न आवडणाऱ्या मार्गांनी आपले लक्ष काबीज करतो. प्रत्येक क्षणी, आपल्याला काय होते किंवा आपल्या सभोवती आपल्याला काय दिसते — दिमाखदार, धोकादायक, किंवा सामान्य —ह्याचा मुळीच विचार न करता, प्रत्येक क्षण आपल्याला उपासनेची प्रेरणा देऊ शकतो. आपल्यामध्ये असलेले कवीचे हृदय स्तब्धतेसाठी आसुसते.
टीम गुस्टाफसन
देवाची महानता आणि निर्मितीक्षमता यांचे चिंतन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या घटना किंवा गोष्टी उद्युक्त करतात? आज तुमच्या सामान्य क्षणात तुम्ही त्याची अद्भुतता कशी अनुभवू शकता?
बापा, आज प्रत्येक गोष्टीत मला तुझा हात पाहण्यासाठी माझे साहाय्य कर. तुझ्या विस्मयकारक कृत्यांचे कौतुक करण्याचे हृदय मला दे.
मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.