आजचा शास्त्रभाग: यहोशवा 1:1–9

“काळ पुढे गेला. युद्ध आत आले.” या शब्दांत दक्षिण सुदानच्या केलिको लोकांचा बिशप सेमी नीगो ह्याने त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबल मिळवण्यासाठी त्याच्या चर्चने केलेल्या दीर्घकालीन धडपडीनंतर देखील होत असलेल्या विलंबाचे वर्णन केले. वास्तविक पाहता, केलिको भाषेत एकही शब्द आतापर्यंत छापण्यात आला नव्हता. काही दशकांपूर्वी, बिशप निगोच्या आजोबाने मोठ्या धैर्याने एक बायबल भाषांतर योजना सुरु केली होती, पण युद्ध आणि अशांतीमुळे त्या प्रयत्नांत खंड पडत गेला. तरीही, उत्तर युगांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगोमधील त्यांच्या रेफ्युजी कॅम्प्सवर पुन्हा पुन्हा हल्ले झाले तरी देखील बिशप आणि सहविश्वासणाऱ्यांनी ती योजना जिवंत ठेवली.

त्यांच्या चिकाटीला यश मिळाले. जवळजवळ तीन दशकांनंतर, एका उत्साहवर्धक समारंभात रेफ्यूजीजना केलिको भाषेतील नवा करार बायबल देण्यात आले. एक प्रोजेक्ट कन्सल्टन्ट म्हणाला, “केलीकोची प्रेरणादायक आस्था शब्दांत सांगता येत नाही.”

केलिकोंची वचनबद्धता देवाने यहोशवाला जी चिकाटी दाखवायला सांगितली होती ती प्रतिबिंबित करते. देवाने त्याला सांगितले तसे, “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल” (यहोशवा 1:8). तेवढ्याच चिकाटीने, केलिकोंनी पवित्र शास्त्राच्या भाषांतराचे काम सुरु ठेवले. आता, “जेव्हा तुम्ही त्यांना कॅम्पसमध्ये पाहता, तेव्हा ते हसतांना दिसतात,” एक भाषांतरकार म्हणाला. “बायबल ऐकणे आणि समजण्याने त्यांना आशा लाभते.” किलिको लाकांसारखेच आपण पवित्र शास्त्राचे सामर्थ्य आणि सुज्ञता शोधणे कधीही सोडू नये.

पॅट्रिशिया रेबॉन

पावित्र शास्त्र वाचण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी झटण्यात तुम्ही किती चिकाटी दाखवता? तुम्हाला ते समजण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहाय्य हवे आहे आणि त्यात अधिक वाढण्यासाठी तुम्ही कोणाकडे साहाय्य मागाल?

प्रेमळ देवा, बायबल माझ्या जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे. तुझ्या सुज्ञतेचा शोध घेत राहणे कधीही न सोडून देता, ती समजण्याची, बायबलचा अभ्यास करण्याची आणि ते समजण्याची भूक माझ्यामध्ये ढवळून वाढव.

मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.