आजचा शास्त्रभाग: यशया 41:10–13
हॅरिएट टबमॅन ही एकोणिसाव्या शतकाची एक महान अमेरिकन नायिका होती. उल्लेखनीय धैर्य दाखवत, स्वतः गलामगिरीतून सुटका मिळवून उत्तर अमेरिकेच्या मोकळ्या प्रदेशात तीनशेहून अधिक सहगुलाम लोकांना सोडवून त्यांना स्वतंत्र केले. तिचे स्वतःचे स्वातंत्र्य उपभोगण्याच्या आनंदात समाधान न मानता, ती गुलामगिरीअसलेल्या राज्यांत एकोणीस वेळा परत गेली, मित्रमंडळी, कुटुंबीय, आणि अपरिचितांना घेऊन पायी प्रवास करत ती थेट कॅनडाला गेली.
ही शौर्यपूर्ण कृती करण्याची प्रेरणाशक्ती तिला कोठून मिळाली? सखोल विश्वास धरणाऱ्या ह्या स्त्रीने एके वेळी असे म्हटले होते: “मी देवाला नेहमीच सांगितले, मी तुला घट्ट धरून ठेवणार आहे, आणि तुला मला यशस्वी करावेच लागेल.” गुलामगिरीतून लोकांना बाहेर काढत असतांना देवाच्या मार्गदर्शनावरचा तिचा भरवसा हा तिच्या यशावर मारलेला शिक्का होता.
देवाला “घट्ट धरून राहणे” म्हणजे काय? यशयाच्या भविष्यवाणीचे एक वचन आपल्याला कदाचित हे दाखवील कीआपण त्याचा हात धरतो तेव्हा वास्तवात तोच आपल्याला धरत असतो. यशया देव बोललेले हे शब्द उद्घृत करतो, “मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो” (41:13).
हॅरिएटने देवाला घट्ट धरून ठेवले, आणि त्याने तिला सुरळीत पुढे नेले. तुमच्यापुढे कोणती आव्हाने उभी आहेत? देव तुमचा हात आणि तुमचे जीवन ताब्यात घेतअसतांना, देवाला घट्ट धरून राहा. “भिऊ नका.” तो तुम्हाला साहाय्य करील.
डेव्ह ब्रॅनॉन
आत्ता ह्या क्षणी तुमचे सर्वात मोठे आव्हान काय आहे? तुम्ही देवावर भरवसा ठेवता हे देवाला माहित व्हावे म्हणून तुम्ही काय करू शकता किंवा बोलू शकता?
स्वर्गीय पित्या, आपण एकट्याने काही करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन कठीण असते, म्हणून मला तुझ्या साहाय्याची गरज आहे. कृपा करून माझ्या सर्वात मोठ्या आव्हानांत माझ्या लगत, अगदी बरोबर येऊन राहा आणि मी एकटा नाही हे समजण्यासाठी मला साहाय्य कर.
ही सात डिव्होशनल्स आमची बालकांसाठी रोजची भाकर यातून डाउनलोड करा! (लिंक यायची आहे)
सोल केअर ऍट ख्रिश्चियन युनिव्हर्सिटी. ऑर्ग/सीसी 201 येथे जीवनाच्या आव्हानांना तोंड देणे शिका.
मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.