आजचा शास्त्रभाग: स्तोत्र 73:21–28
FEARFULLY AND WONDERFULLY MADE, (भयप्रद व अद्भुत रीतीने झालेली घडण) ह्या फिलिप यांसीं सोबत सह-लिखित पुस्तकात, डॉ. पौल ब्रँड यांनी असे मत व्यक्त केले, की एका हमिंग बर्डच्या हृदयाचे वजन एका औंसाच्या लहानशा अंशाइतके असते आणि ते दर मिनिटाला आठशे ठोके देते; एका ब्लू व्हेलच्या हृदयाचे वजन अर्धा टन असते ते एका मिनीटात केवळ दहा ठोके देते, आणि ते ठोके दोन मैल दूर ऐकू येतात. ह्या दोन्हींच्या उलट, मानवी हृदय मंदपणे चालते असे दिसते, तरी ते दिवसाला १ लाख वेळां ठोके देऊन (दर मिनिटाला ६५ – ७० ठोके याप्रमाणे) विश्रांतीसाठी काहीही वेळ न घेता, आपल्यापैकी बहुतेकांना सत्तर किंवा अधिक वर्षें जगवत, आपले काम करते.
हे विस्मयकारक हृदय आयुष्यभर एवढ्या पूर्णपणे आपल्याला ताकद पुरवते की आपल्या सर्वंकष अंतस्थ ठाकठीक प्रकृतीचे ते रुपक बनले आहे. तरी, आपली शब्दशः आणि रुपकात्मक ही दोन्ही हृदये बंद पडू शकतात. आपण काय करु शकतो?
इस्राएलचा उपासना चालक, स्तोत्रकर्ता आसाफ, ह्याने स्तोत्र ७३ मध्ये खरे बळ कोठून तरी — दुसऱ्या कोणापासून तरी — येते हे मान्य केले आहे. त्याने लिहिले, “माझा देह व माझे हृदय ही खचली तरी देव सर्वकाळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे.”(व.26). आसाफ योग्य तेच बोलला. जिवंत देव आप ले अंतिम आणि अनंतकालीन बळ आहे. आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता म्हणून त्याच्या परिपूर्ण सामर्थ्याला काहीही मर्यादा नाहीत.
आपल्या अडचणीच्या आणि आव्हानांच्या समयांत आसाफ त्याच्या स्वतःच्या संघर्षातून जे शिकला ते आपण जाणून घेऊ या: आपल्या हृदयाचे खरे बळ देव आहे. आपण त्या बळांत प्रत्येक दिवशी विसावू शकतो.
बिल क्रॉऊडर
तुमचे रुपकात्मक हृदय तुमच्या आत्मिक हृदयासारखे कसे आहे? जेव्हा तुमची “आशा संपत आहे” असे तुम्हाला वाटते, तेव्हा तुमच्या प्रेमळ, काळजी वाहणाऱ्या पित्यात तुम्ही बळ कसे मिळवू शकता?
स्वर्गीय पित्या, जेव्हा मी अशक्त असतो तेव्हा तू बलवान असतोस ह्यासाठी मी तुझे आभार मानतो. की जेव्हा भावनात्मक भाराखाली मी दडपलेला असतो तेव्हा तू पुरेसा आहेस. की जेव्हा मी गोंधळलेला असतो, तेव्हा तुझ्याकडे परिपूर्ण नि:संदिग्धता असते.
मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.