आजचा शास्त्रभाग: लूक 2:25–35
इंग्रजी मुव्ही हाचि: एका कुत्र्याची गोष्ट, ह्यात, एका कॉलेज प्रोफेसरने हाचि नावाच्या एका मोकाट कुत्र्याच्या पिल्लाशी मैत्री जोडली. प्रत्येक दिवशी तो प्रोफेसर कामावरून परतत असे त्या ट्रेन स्टेशनवर प्रोफेसर येण्याची वाट पाहत थांबून तो कुत्रा त्याची निष्ठा दाखवत असे. एके दिवशी मेंदूतील रक्तस्रावाने प्रोफेसर मरण पावला. हाचि स्टेशनवर अनेक तास वाट पाहत थांबला, आणि पुढील दहा वर्षांत तो नियमितपणे प्रत्येक दिवशी स्टेशनकडे येत होता—त्याचा प्रेमळ धनी येईल ह्या अपेक्षेने.
लूक, जो त्याच्या येऊ घातलेल्या धन्याची सबुरीने वाट पाहत होता त्या शिमोन नावाच्या एका मनुष्याची गोष्ट सांगतो. (लूक 2:25). पवित्र आत्म्याने शिमोनाला हे प्रकट केले होते की प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर त्याला मरण येणार नाही (व. 26). परिणामी, जो देवाच्या लोकांना “तारण” पुरवणार आहे त्याच्यासाठी शिमोन वाट पाहत राहिला (व. 30). जेव्हा मरीया आणि योसेफाने येशूला घेऊन मंदिरात प्रवेश केला, तेव्हा पवित्र आत्म्याने शिमोनाला हलक्या आवाजात कुजबुजून सांगितले की हाच तो होता! प्रतीक्षा शेवटी संपली होती! शिमोनाने —सर्व लोकांकरिता आशा, तारण, आणि सांत्वन/दिलासा (व.व.28–32) असलेल्या ख्रिस्ताला त्याच्या हातात धरले.
जर आपल्यासाठी हा प्रतिक्षेचा समय असेल तर, आपण नव्याने यशया संदेष्ट्याचे शब्द ऐकू या: “तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. (यशया 40:31). आपण येशू परत येण्याची वाट पाहत असतांना, तो प्रत्येक नव्या दिवसाकरिता आपल्याला लागणारी आशा आणि बळ पुरवतो.
मरव्हिन विल्यम्स
देवाची वाट पाहत असतांना तुम्ही कधी दमून गेला आहात का? त्या आव्हानात्मक समयात टिकून राहण्यासाठी तुम्हाला कशाने उत्तेजन दिले?
येशू, मी तुझी वाट पाहत राहीन. वेदना, अश्रू, आणि अनिश्चितता ह्यातून जात असतांना, मी दमून जाऊ नये पण तुझ्या पुरवठ्यात विश्राम अनुभवावा ह्यासाठी माझे साहाय्य कर.
मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.