आजचा शास्त्रभाग: योहान 12:25–33, 35–36

अजस्त्र चक्रीवादळ येणार असा हवामानाचा अंदाज होता. जेव्हा वातावरणाचा दाब कमी होतो तेव्हा हिवाळी वादळ असेच वेगाने जोर धरून वाढत असते. जेव्हा रात्र व्हायला आली तसे, धुळीने भरलेल्या तुफानी स्थितीने विमानतळाकडे जाणारा हायवे दिसणे अशक्य झाले. जवळजवळ. पण तुमची मुलगी तुम्हाला भेटायला विमानाने येत असेल तर, तुम्हाला जे केले पाहिजे ते तुम्ही करताच.तुम्ही काही जादा कपडे आणि पाणी (हायवेवर तुम्ही अडकून पडला तर), फार सावकाश कार चालवता, सतत प्रार्थना करता, आणि शेवटचे पण महत्वाचे, तुमच्या गाडीच्या पुढच्या प्रखर दिव्यांवर अवलंबून राहता. आणि कधी कधी तुम्ही जवळ जवळ अशक्य असलेले काही करून दाखवता. 

येशूने क्षितिजावर येणाऱ्या एका वादळाचे भविष्य कथन केले, ह्या वादळात त्याचे मरण असेल असे वादळ (योहान 12:31–33), आणि जे त्याच्या अनुयायांना त्याच्याशी विश्वासू राहून त्याची सेवा करायचे आव्हान त्यांच्यापुढे ठेवील असे वादळ (व. 26).  अंधार पडणार होता आणि डोळ्यांना काही दिसणे अशक्य होणार होते. जवळजवळ. मग येशूने त्यांना काय करायला सांगितले? प्रकाशावर विश्वास ठेवा किंवा भरवसा ठेवा (व.36). पुढे जात राहणे आणि विश्वासु राहण्याचा तो एकच मार्ग होता. 

आणखी थोडाच काळ येशू त्यांच्यासोबत राहणार होता. पण मार्गावर प्रकाश पाडण्यासाठी विश्वासणाऱ्यांकडे आपला अविरत मार्गदर्शक पवित्र आत्मा आहे. जेव्हा पुढचे काहीही दिसणे अशक्य असेल अशा अंधाऱ्या वेळां आपल्यापुढे देखील येतील. जवळजवळ. पण त्या प्रकाशावर विश्वास ठेवण्याने किंवा भरवसा ठेवण्याने, आपण अटीतटीने ते करत राहू शकतो.

जॉन ब्लेस 
 
अलीकडे तुम्ही कोणत्या कठीण समयातून गेला आहात? येशू, जो प्रकाश, त्याने तुम्हाला पुढे जात राहण्यात कसे साहाय्य केले? 

येशू, आमच्या अंधकारात आमचा प्रकाश बनण्यासाठी तुझे आभार मानतो.  तुझ्यावर भरवसा ठेवून पुढे जात राहण्यासाठी आमचे साहाय्य करा.

मराठी भाषेत प्रस्तुत होणाऱ्या “आपली रोजची भाकर” ह्या आमच्या वर्ष २०२२च्या वार्षिक आवृत्तीमधील अशी भक्तिपर प्रबोधनं अधिक वाचा आणि दररोज देवाच्या वचनावर मनन करा. प्रतिदिन नियमितपणे देवाचा शोध घेण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून त्याद्वारे एक अर्थपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होते. लक्षात ठेवा, तुमची कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवण्याने त्याच्या इच्छेनुसार व्यक्ती स्वरूप तुम्हांमध्ये बदल घडू शकतो. ह्या आवृत्तीची किंमत केवळ १५०/- आहे.